BMC

मुंबई महापालिकेच्या १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण (18 Security Guards Of BMC Tested Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून पालिका मुख्यालय, विभाग कार्यालयासह मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या पालिकेच्या सुरक्षेला कोरोनाने भेदले आहे.

    मुंबई : तिसऱ्या लाटेचा विळखा (Corona Third Wave) मुंबईला (Mumbai) बसला असून मुंबई महापालिकेच्या १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण (18 Security Guards Of BMC Tested Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून पालिका मुख्यालय, विभाग कार्यालयासह मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या पालिकेच्या सुरक्षेला कोरोनाने भेदले आहे.

    फेब्रुवारी २०२१ च्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट मुंबईत धडकली. पण योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले. मात्र २१ डिसेंबर २०२१ नंतर मुंबईत तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आणि रोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण संख्या २१ हजारांच्या घरात पोहोचली. तिसऱ्या लाटेचा विळखा मुंबई पोलीस, आरोग्य कर्मचारी यांना बसला आहे. तर दोन्ही लाटांमध्ये पालिकेचे २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असताना आता पालिकेची सुरक्षा करणाऱ्या रक्षकांना कोरोनाने लक्ष केले आहे. २१ डिसेंबर ते आतापर्यंत तब्बल १८ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे सुरक्षा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

    गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची पहिली तर फेब्रुवारी २०२१ च्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट मुंबईत धडकली होती. या दोन्ही लाटांमध्ये पालिकेचे सुरक्षा रक्षक कोरोनामुळे बाधित झाले होते. दोन्ही लाटेत तब्बल ३१७ सुरक्षा रक्षक कोरोना बाधित झाले होते. तर १४ सुरक्षा रक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर आतापर्यंत २९२ सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले असून ११ सुरक्षा रक्षक होम क्वारंटाईन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.