महाराष्ट्राच्या २० वर्षीय मालविकाने सायनाचा केला पराभव, मुलीच्या प्रशिक्षणासाठी आईने वैद्यकीय व्यवसाय पणाला लावत, दररोज ९ तास दिला साथ

मराठमोळ्या २० वर्षीय मालविका बनसोडेने इतिहास रचला आहे. दिल्लीच्या केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये भारतीय बॅडमिंटनमधला (India Open 2022) सगळ्यात मोठा उलटफेर झाला आहे. भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट सायना नेहवालचा (Saina Nehwal) महाराष्ट्राच्या मालविका बनसोडने धक्कादायक पराभव केला. 20 वर्षांची नागपूरची रहिवासी असणाऱ्या मालविकाने हा इतिहास घडवला आहे. मालविकाने सायनाचा सलग दोन सेटमध्ये पराभव केला आहे.

    नवी दिल्ली : मराठमोळ्या २० वर्षीय मालविका बनसोडेने इतिहास रचला आहे. दिल्लीच्या केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये भारतीय बॅडमिंटनमधला (India Open 2022) सगळ्यात मोठा उलटफेर झाला आहे. भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट सायना नेहवालचा (Saina Nehwal) महाराष्ट्राच्या मालविका बनसोडने धक्कादायक पराभव केला. 20 वर्षांची नागपूरची रहिवासी असणाऱ्या मालविकाने हा इतिहास घडवला आहे. मालविकाने सायनाचा सलग दोन सेटमध्ये पराभव केला आहे. महिला सिंगल्सच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मालविकाने सायनाचा 21-17, 21-9 अशा सलग दोन सेटमध्ये पराभव केला. त्यामुळं मालविकाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

    बॅडमिंटनमधील हा सामना सायना-मालविका यांच्यात 34 मिनिटं चालला. मालविकाचा आता पुढचा सामना आकर्षी कश्यपसोबत होणार आहे. सायना नेहवालने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेक रिपब्लिकची खेळाडू टेरेझा स्वाबिकोव्हाविरुद्ध विजय मिळला होता. या सामन्यात पहिला सेट 20-22 ने गमावल्यानंतर टेरेझा स्वाबिकोव्हा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेली, ज्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आलं होतं. तर मालविकाने तिच्या पहिल्या सामन्यात सामिया इमाद फारुकीला 21-18, 21-9 ने हरवलं होतं.

    दरम्यान, दुसऱ्या राऊंडमध्ये ऑलिम्पिकची दोनवेळची मेडलिस्ट पीव्ही सिंधूने (PV Sindhu) विजय मिळवला आहे. तिने भारताची इरा शर्माला 21-10, 21-10 ने हरवलं. दोघांमधली मॅच 30 मिनीटं चाललं. तिसरा राऊंड म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना भारताच्याच अश्मिता चलिहासोबत होईल. मालविकाच्या या कामगिरीमुळं मालविकाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.