भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला? काँगेसचा भाजपाला प्रश्न

भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काळात पुलवामा हल्ला घडला, शाहांनी राजीनामा दिला का? भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते? भाजपने २०१४पासून त्यांच्या एकनाथ खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?” असा सवाल राजू वाघमारेंनी उपस्थित केला आहे.

  मुंबई: परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणावरून सत्ताधारी पक्षालाया कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. या प्रकरणावरून काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी जपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?” असा प्रश्न विचारत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी भा. सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस, असा बोचरा वारही वाघमारेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे.

  “भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काळात पुलवामा हल्ला घडला, शाहांनी राजीनामा दिला का? भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते? भाजपने २०१४पासून त्यांच्या एकनाथ खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?” असा सवाल राजू वाघमारेंनी उपस्थित केला आहे.

  “वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना तातडीने पायउतार व्हावे लागले. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही?” या भाजपच्या ट्विटवर राजू वाघमारेंनी उत्तर दिलं. १५ फेब्रुवारीला प्रेस झाली परंतु हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. भाजप नेते कृपा करून तपासून घ्या” असे टीकास्त्रही वाघमारेंनी सोडले आहे.

  परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब फुसका! फेब्रुवारीत सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शंका! आणि भेट जरी झाली तरी १०० कोटींच्या वसुलीची बातमी खरी कशी? फक्त अधिकारी पत्र देतो म्हणून मंत्री राजीनामा देणार? गुन्हा हा जिलेटीन कार आणि मनसुख हिरेन मृत्यू तपास भरकटवून सिंग!आता भाजप स्वतःचे तोंड काळे करतील का?” असा टोलाही राजू वाघमारेंनी लगावला आहे.

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी १५फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं

  देवेंद्र फडणवीस यांनी थेट १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला