मुंबईत २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

केईएम आणि मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील आहे. दुसरा डोस घेतल्यानंतरही या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. केईएम रुग्णालय व सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

    मुंबई : मागील आठवड्यात भायखळ येथील तुंरुगात ३९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची बातमी ताजी असताना, आता केईएम आणि मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील आहे. दुसरा डोस घेतल्यानंतरही या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. केईएम रुग्णालय व सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मागील दोन-तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं जातं. कोरोनाची लागण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे वसतिगृह सील करण्यात येण्याची शक्यता आहे.

    मागील आठवड्यात भायखळ येथील तुंरुगात ३९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची बातमी ताजी असताना, आता केईएम आणि मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाने आणखी ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या १ लाख ३९ हजार ११ जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे.

    देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 5 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 23 हजार 529 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 311 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.