परमबीर सिंह यांच्यासह २५ पोलिस अधिकाऱ्यांना डच्चू मिळणार; नोकरीही जाणार आणि अटकही होणार?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्र्यावर वसुली प्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांच्यासह अन्य २५ सहकारी पोलीस अधिका-यांवर मुंबई आणि ठाण्यात विविध पोलिस ठाण्यात, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह या २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर करून निलंबनाची शिफारस केली आहे. गृहविभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत अधिक माहिती मागविण्यात आली असून त्याची पूर्त ता झाल्यावर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्र्यावर वसुली प्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांच्यासह अन्य २५ सहकारी पोलीस अधिका-यांवर मुंबई आणि ठाण्यात विविध पोलिस ठाण्यात, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह या २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर करून निलंबनाची शिफारस केली आहे. गृहविभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत अधिक माहिती मागविण्यात आली असून त्याची पूर्त ता झाल्यावर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

    सेवेतून मुक्त होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई ?

    या अहवालात चार पोलिस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिका-यांवर दाखल गुन्हयात चौकशी सुरू असून सेवेतून मुक्त होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील केली जावू शकते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अकोला पोलिस दलातील पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची खुली चौकशी करण्याची विनंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. हा गुन्हा ठाणे शहरात घडल्याने त्याचा तपास नंतर ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

    सखोल माहिती अहवालानंतर कारवाई?

    त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर मुंबईसह ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यांच्यासह इतर पोलिसांवरही खंडणीसह भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिसांवर मुंबईसह ठाणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वेगवेगळे गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. या सर्व गुन्ह्यांची पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिका-यांवर निलंबनाची शिफारस करण्याची विनंती गृहविभागाकडे केली आहे. या पोलिस अधिकाऱ्यांची खंडणीसह भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत नेमकी काय भूमिका होती, त्यांचा कुठपर्यंत सहभाग होता याबाबतची माहिती गृह विभागाने मागविली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.