2,65,989 kg Nirmalya deposit in Ganeshotsav; BMC will make Nirmalya fertilizer and use it in the garden

गणेशोत्सवात गणेशमूर्तींसह गौरी, हरतालिका यांचे विसर्जन झाल्यावर २४६ विसर्जन स्थळी निर्माल्य कलशाच्या माध्यमातून दहा दहा दिवसांच्या कालावधीत एकूण २ लाख ६५ हजार २७९ किलोग्रॅम इतके हार, फुले, दुर्वा आदी निर्माल्‍य जमा करण्‍यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६० हजार ९०० किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी जमा करण्यात आले. सदर जमा निर्माल्‍यावर विविध ३८ ठिकाणी शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्‍यात येत असून त्यापासून खत तयार करून त्या खताचा महापालिकेच्या उद्यानांमध्ये उपयोग करण्यात येणार आहे.

    मुंबई : गणेशोत्सवात २,६५,९८९ किलो निर्माल्य जमा झाले असून या निर्माल्याचे खत बनवून पालिकेच्या उद्यानात वापरण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

    यंदा कोरोनामय वातावरणात नियमांचे पालन करून लाखो मुंबईकरांनी श्रीगणेशोत्सव साजरा केला. श्रीगणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांच्या कालावधीत १ लाख ५७ हजार २२९ गणेशमूर्तींचे आणि ६ हजार ५३२ गौरी, हरतालिकांचे असे एकूण १ लाख ६४ हजार ७६१ गणेशमुर्तीं, गौरी, हरतालिका यांचे निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले.