राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णांची नोंद; मुंबईत ५८९० नवीन रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,४५,५१८ (१४.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबई : सोमवारी राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,४५,५१८ झाली आहे. आज २०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २३,५३,३०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,३६,५८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज १०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १०२ मृत्युपैकी ८५ मृत्यु हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यु हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू ठाणे-२ आणि अकोला-१ असे आहेत.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,४५,५१८ (१४.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५८९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    दरम्यान मुंबईत दिवसभरात ५८९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४०४६१४ एवढी झाली आहे. तर आज १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आतापर्यंत ११६६५ मृत्यूची नोंद करण्यात आली.