आता बोला! मुंबईतील पुलांच्या दुरुस्तीचा खर्च ३४ कोटी; खर्चात झाली वाढ

मुंबईतील जुने व धोकादायक पूल हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मीडिया, राजकारणी, सोशल मिडिया याठिकाणी चर्चेला आणि उधाण आले होते. त्यामुळे या गोखले पूल आणि हिमालय पुलांच्या दुर्घटनेनंतर पुलांच्या मजबुतीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पालिकेने, धोकादायक आणि जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीकामे हाती घेतली. त्यानुसार पालिकेने तातडीने मुंबईतील दादर टिळक रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी, करी रोड, शीव रेल्वे स्थानक, शीव रुग्णालय येथील उड्डाणपुल, दादर फुलमार्केट पादचारी पुल आदी पुलांची दुरुस्तीकामे हाती घेतली.

    मुंबई : मुंबईत अंजुमन इस्लाम शाळेनजीकचा हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी अचानक कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले होते. तत्पूर्वी, अंधेरी येथे ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल दुर्घटना घडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. या पुलांच्या दुर्घटनांमुळे मुंबईतील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. या पडझडीमध्ये गोखले पूल आणि हिमालय पुलांच्या समावेश आहे. मात्र काही तांत्रिक कामांमुळे आणि कामातील बदलांमुळे पुलांच्या दुरुस्तीच्या खर्चात ७.८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सदर कंत्राटकामाची मूळ किंमत २६.०२ कोटी रुपयांवरून आता ३३.८६ कोटी रुपयांवर गेला आहे. यासंदर्भातील वाढीव खर्चाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावावर विरोधक आणि भाजप यांच्याकडून आक्षेप घेण्यात येऊन वाढीव खर्चाबाबत जाब विचारला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    मुंबईतील जुने व धोकादायक पूल हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मीडिया, राजकारणी, सोशल मिडिया याठिकाणी चर्चेला आणि उधाण आले होते. त्यामुळे या गोखले पूल आणि हिमालय पुलांच्या दुर्घटनेनंतर पुलांच्या मजबुतीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पालिकेने, धोकादायक आणि जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीकामे हाती घेतली. त्यानुसार पालिकेने तातडीने मुंबईतील दादर टिळक रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी, करी रोड, शीव रेल्वे स्थानक, शीव रुग्णालय येथील उड्डाणपुल, दादर फुलमार्केट पादचारी पुल आदी पुलांची दुरुस्तीकामे हाती घेतली. त्यासाठी पालिकेने २६ कोटी रुपयांची कंत्राटकामे दिली.

    पुलांच्या दुरुस्तीचा खर्च २६ वरून थेट ३४ कोटींवर! 

    महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट काही अडचणीमुळे नीटपणे करता आले नव्हते. त्यामुळे तांत्रिक सल्लागाराने आपल्या अहवालात महालक्ष्मी रेल्वेस्थानक पुलाच्या मजबुतीकरणासाठी विविध कामे सुचवली. पुलावरील जास्तीचा भार कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. अशाच प्रकारची आणखीन काही कामे इतर पुलांबाबत हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीखर्चात वाढ झाली आहे. दुरुस्तीच्या खर्चात ७.८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सदर कंत्राटकामाची मूळ किंमत २६.०२ कोटी रुपयांवरून आता ३३.८६ कोटी रुपयांवर गेला आहे. यासंदर्भातील वाढीव खर्चाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावावर विरोधक आणि भाजप यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे.