
पुणे : म्हाडाच्या भरती परीक्षेअंर्तगत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. पुणे सायबर पोलिसांनी तपास करत, डॉ. प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संतोष हरकळ या तिघांविरोधात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात तीन हजार 500 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे(Mhada Exams Paper Leak Case).
पुणे पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली. देशमुख आणि हरकळ बंधू यांच्या शिवाय जमाल इब्राहीम पठाण (47), कलीम गुलशेर खान (52), दिपक विक्रम भुसारी (32) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरा फुटीचा तपास सुरु असताना म्हाडाच्या पेपर फुटी संदर्भांतही सातत्याने माहिती समोर येत होती. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनाही सारख्या सांगत होत्या की म्हाडाचा पेपर फोडण्याच्या तयारीत काही लोक आहेत. त्यानुसार आम्ही माहिती घेत आमच्या टीम तयार केल्या.
पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे याठिकाणी या टीम पाठवण्यात आल्या होत्या. आमचा संशय खरा ठरला पेपर फोडणाऱ्या काही लोकांना आम्ही ताब्यात घेतल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. पोलिसांना तपास करता असताना सुरवातीला आम्हाला औरंगबादला काही क्लासेस चालवणारे लोक भेटले. त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य भरतीच्या पेपरसंदर्भातही माहिती मिळाली. त्यांच्याकडे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे डॉक्युमेंट्सही आढळून आली.
यात परीक्षा देणाऱ्या तीन परीक्षार्थींचे अॅडमीट कार्ड आढळून आले. हरकळ ब्रदर्स यामध्ये काही तरी घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्याच वेळी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुखही त्यांच्या गाडीत आढळून आला. त्याच्याकडे लॅपटॉप होता, त्याच्या काही मॉडेल प्रश्नपत्रिका होत्या. तसेच अनेक पेनड्राईव्ह ही मिळून आले, असे पोलिसांनी सांगितले.