भायखळा तुरुंगामध्ये ३९ जणांना कोरोनाची लागण

भायखळा येथील तुरुंगात कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली आहे. त्यानुसार २० महिला, पाच मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त पुरुषांच्या वॉर्डात १० कैद्यांनाही कोरोना झाला आहे. या दहा कैद्यांमध्ये एका वरिष्ठ नागरिकाचा समावेश आहे. सर्व कोरोना संक्रमितांना शाळेजवळ उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर वरिष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत

    मुंबई : जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना, आणि दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता मुंबईतल्या भायखळा तुरुंगात कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मुंबईतील भायखळा तुरुंगात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तुरुंगातील ३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे.

    भायखळा येथील तुरुंगात कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली आहे. त्यानुसार २० महिला, पाच मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त पुरुषांच्या वॉर्डात १० कैद्यांनाही कोरोना झाला आहे. या दहा कैद्यांमध्ये एका वरिष्ठ नागरिकाचा समावेश आहे. सर्व कोरोना संक्रमितांना शाळेजवळ उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर वरिष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत.

    कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, गेल्याच आठवड्यात तुरुगांत कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान रुग्णांसदर्भात माहिती समोर आली. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट्स समोर आल्यानंतर तातडीने कैद्यांसह अन्य कैद्यांना सुद्धा उपचारासाठी पाठवण्यात आले. या दरम्यान जेल अधिकाऱ्यांनी म्हटले की, तुरुंगाच्या आतमध्ये वेळोवेळी कोरोनाच्या तपासणीचे अभियान राबवले जात आहे.

    तसेच कैद्यांची कोरोनाची चाचणी नियमित रुपात केली जाते. कारण कैद्यांना कोर्टाच्या तारखा आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले जाते. अशातच बाहेरील व्यक्तींसोबत येणाऱ्या संपर्कामुळे ते संक्रमित होण्याची शक्यता अधिक वाढते. या सर्व गोष्टी लक्षात घेता वेळोवेळी कोरोनाची चाचणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

    दरम्यान, भायखळा तुरुंगातील कैद्यांची क्षमता २६२ आहे. जानेवारीच्या आकडेवारीनुसार तेथे ३६५ कैदी ठेवण्यात आले होते. त्यात १६ महिला कैद्यांवरील आरोप सिद्ध झालेले होते. तसेच डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार या तुरुंगात ६६ परदेशी महिला कैद्यांनाही ठेवण्यात आलं होतं.