Don't go for ST strike! There is no settlement on Monday either; The High Court directed the organization to present its position before the three-member committee

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने कामगारांना कर्तव्यावर हजर होण्याचे वारंवार आवाहन करत आहे. मात्र, तरी सुद्धा कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचे संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली. 

    मुंबई: एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने कामगारांना कर्तव्यावर हजर होण्याचे वारंवार आवाहन करत आहे. मात्र, तरी सुद्धा कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचे संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली.

    कारवाईच्या धास्तीने आता कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रविवारी दिवसभरात राज्यात ४१४४ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर अजूनही प्रत्यक्ष संपात ८८१२२ कर्मचारी सहभागी आहेत. रविवारी दिवसभरात ४९ मार्गावर १६७ बसेस धावल्या असून १४ हजार ६१९ प्रवाशांनी प्रवास केला आहे(4144 ST employees resumed work on Sunday due to fear of suspension; 14 thousand 619 passengers traveled).

    रविवारी धुळे आगारातून सुटलेल्या १० साधी एसटीमध्ये कर्मचाऱ्याची नवीन नियुक्ती केली असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. तसेच जळगाव आगारातूनही सुटलेल्या चार गाड्यावरही नवीन नियुक्ती केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    रविवारी दिवसभरात शिवनेरी -३१, शिवशाही -७३, साधी एसटी – ३३ सुटल्या असल्याची माहिती महामंडळाने दिली. रविवारी सर्वाधिक गाड्या धुळे आगारातून १२,पुणे आगारातून १० गाड्या साेडण्यात आल्या त्यापाठाेपाठ सांगली आगारातून ७ गाड्या साेडण्यात अआल्या. इतर आगारातून दाेन अथवा तीन गाड्या साेडण्यात आल्या.