प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे. नव्या निर्बंधानुसार, केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावी लागणार आहे. तर, अंत्यसंस्कारांना केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे(50 for the wedding and only 20 for the funeral; Strict restrictions on tourist destinations, beaches throughout the state).

    मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे. नव्या निर्बंधानुसार, केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावी लागणार आहे. तर, अंत्यसंस्कारांना केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे(50 for the wedding and only 20 for the funeral; Strict restrictions on tourist destinations, beaches throughout the state).

    पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणं अशा ठिकाणी निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत. मात्र दुकानं, मॉल, सिनेमागृह यांविषयी अजून आदेश जारी झालेले नाहीत.

    राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमालीची वाढत आहे. ओमायक्रॉनबाधितांसह कोरोना रूग्णांचे आकडे रोजच वाढत आहेत. त्यामुळे सरकारने अखेर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.