The slums are corona-free; There is no restricted area in 18 wards

मुंबईच्या 86.4% लोकांमध्ये कोरोना संक्रमणाविरोधात लढणाऱ्या ॲण्टिबॉडिज आढळल्या आहेत. यात 85.07% पुरुष व 88.29% महिलांचा समावेश आहे. ही माहिती सायन रुग्णालय, एटीआय चंद्रा फाउंडेशन व आयडीएसी इन्स्टिटयुटच्या सिरो सर्व्हेमधून समोर आली आहे. मुंबईत हा पाचवा सिरो सर्व्हे करण्यात आला. यात गेल्या चार सर्व्हेमधील सर्व रेकॉर्ड मागे पडले आहेत.

    मुंबई : मुंबईच्या 86.4% लोकांमध्ये कोरोना संक्रमणाविरोधात लढणाऱ्या ॲण्टिबॉडिज आढळल्या आहेत. यात 85.07% पुरुष व 88.29% महिलांचा समावेश आहे. ही माहिती सायन रुग्णालय, एटीआय चंद्रा फाउंडेशन व आयडीएसी इन्स्टिटयुटच्या सिरो सर्व्हेमधून समोर आली आहे. मुंबईत हा पाचवा सिरो सर्व्हे करण्यात आला. यात गेल्या चार सर्व्हेमधील सर्व रेकॉर्ड मागे पडले आहेत.

    मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ॲण्टिबॉडिज असणाऱ्या लोकसंख्येवर आनंद जाहीर केला आहे. तसेच त्यांना नियमांचे सक्तीने पालन करण्याचा सल्लादेखील दिला आहे. चहल यांनी सांगितले की, पाचव्या सिरो सर्व्हेमध्ये सहभागी 65% नागरिकांनी कोरोना लस घेतली होती. 35% लोकांनी लसीचा एकही डोज घेतला नव्हता. यात लस घेतलेल्या 90.26% लोकांमध्ये ॲण्टिबॉडिज आढळल्या आहेत. लस न घेतलेल्या 79.86% लोकांमध्ये अॅण्टिबॉडिज सापडल्या आहे. याशिवाय 87.14% आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही ॲण्टिबॉडिज आढळल्या आहेत. हा सर्व्हे 12 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2021 या काळात 8,674 लोकांवर करण्यात आला होता.

    ॲण्टिबॉडिज सुरक्षेची गॅरेंटी नाही

    पाचव्या सिरो सर्व्हे रिपोर्ट जारी करण्याबरोबरच प्रशासनाने अर्लटदेखील जारी केला आहे. बीएमसीने म्हटले आहे की, ॲण्टिबॉडिज किती टक्के सुरक्षा देते याविषयी कोणतीही हमी देता येऊ शकणार नाही. सर्व्हेमध्ये समोर आले आहे की, झोपडपट्टीत राहणाऱ्या 87.02% व अन्य भागात राहणाऱ्या 86.22% लोकांमध्ये ॲण्टिबॉडिज आढळल्या आहेत.

    जुलै 2020 मध्ये झालेल्या पहिल्या सिरो सर्व्हेमध्ये स्लम एरियात राहणाऱ्या 16% लोक कोरोना संक्रमित आढळले होते. ऑगस्ट 2020 मध्ये दुसरा सिरो सर्व्हे झाला. यात हे प्रमाण वाढून 18% झाले होते. मार्च 2021 मध्ये तिसऱ्या सर्व्हेत ही आकडेवारी 28.5% झाली होती. चौथ्या सिरो सर्व्हेत सुमारे 50% मुलांमध्ये ॲण्टिबॉडिज आढळल्या होत्या. तिसऱ्या सिरो सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले होते की, मुंबईच्या झोपडपट्टी भागात पूर्वी करण्यात आलेल्या दोन सर्व्हेंच्या तुलनेत कमी लोक कोरोना संक्रमित होत होते. याउलट शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या शरीरात ॲण्टिबॉडिज तयार होण्याचा टक्का वाढला होता.