राज्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण सापडले; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. आम्ही काही नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल,अशी माहिती डीएमईआरचे संचालक डॉ. लहाने यांनी दिली. डेल्टा प्लसचे ५ रुग्ण रत्नागिरीत आढळून आले आहेत. 

    मुंबई:  देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून यायचे. आता हाच आकडा ६० हजारांच्या खाली आला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. राज्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमध्ये डेल्टा प्लसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

    या व्हेरिएंटमुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ ते १० लाखांपर्यंत जाऊ शकते आणि यातील १० टक्के रुग्ण लहान मुलं असू शकतात असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.