संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

राज्य सरकारने राज्यातील महिला पोलिसांना १२ तासांहून कमी करून ८ तास ड्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनीच माहिती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्टिट करत राज्य सरकारच्या निर्णयाबाबत कौतुक करत आभार मानले आहेत.

    मुंबई : राज्य सरकारने राज्यातील महिला पोलिसांना १२ तासांहून कमी करून ८ तास ड्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनीच माहिती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्टिट करत राज्य सरकारच्या निर्णयाबाबत कौतुक करत आभार मानले आहेत.

    सुप्रिया सुळेंचे व्टिट करत आभार

    सुप्रिया सुळे यांनी व्टिट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलजी यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.

    यशोमती ठाकूर यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

    अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ड्युटीमध्ये ४ तासांची कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची करण्याबाबत नागपूर शहरात प्रायोगिक तत्वावर ८ तासांच्या ड्युटीचा उपक्रम सुरु केला होता. त्यानतंर पोलिस महासंचालकानी या निर्णय़ाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती. पुढे पुणे ग्रामीण पोलिसातील महिलांसाठीही ८ तासांची ड्युटी करण्यात आली होती.