केंद्रीय विद्यालयाच्या मनमानी कारभार करणाऱ्या प्राचार्यांबाबत क्षेत्रीय विभागीय शिक्षण उपायुक्त कार्यालयाला मनविसेच्या शिष्टमंडळाने दिली भेट

अनेक विषयावर उपयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच चर्चेअंती कोविड सदृश परिस्थितीत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितार्थ स्थानिक प्रशासनाकडून निर्गमित केलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या प्राचार्यांविरुध्द आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

    मुंबई : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत, केंद्रीय विद्यालयातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा क्षेत्रातील विभागीय शिक्षण उपायुक्त स.प. पाटील व सहाय्यक उपायुक्त लाले यांची मुंबईतील केंद्रीय विद्यालयाच्या मनमानी कारभार करणाऱ्या प्राचार्यांबाबत मनविसेच्या शिष्टमंडळाने क्षेत्रीय विभागीय शिक्षण उपायुक्त कार्यालयाला भेट दिली आणि विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चाही करण्यात आली.

    अनेक विषयावर उपयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच चर्चेअंती कोविड सदृश परिस्थितीत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितार्थ स्थानिक प्रशासनाकडून निर्गमित केलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या प्राचार्यांविरुध्द आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र उपायुक्तांद्वारे मनविसे शिष्टमंडळास देण्यात आले.

    मनविसे शिष्टमंडळात मनविसे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, उपविभाग अध्यक्ष प्रफुल्ल दळवी, शाखा अध्यक्ष रविंद्र मालुसरे, मनविसे उपविभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, महादेव पवार व उपविभाग सचिव संतोष मोहिते उपस्थित होते.