Breaking News : मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग ; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबईतील (Mumbai) फिनिक्स मॉलमध्ये (Phoenix Mall ) भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज रविवारी सकाळी कुर्ला परिसरात घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या (fire brigade vehicles) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील (Mumbai) फिनिक्स मॉलमध्ये (Phoenix Mall ) भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज रविवारी सकाळी कुर्ला परिसरात घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या (fire brigade vehicles) घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मुंबईतील सर्वात मोठा मॉल असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.