Drug smuggling through cakes, pastries NCB raids in Malad

सुशांत मृत्यू प्रकरणानंतर मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीबीने मालाडच्या एका बेकरीवर छापा टाकून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला होती. त्यावेळी तीन तस्करांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यक्तिला अटक करण्यात आली असून तो एका कॉलेजमधील विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, त्या व्यक्तिकडून एलएसडी नावाचे ड्रग्ज एनसीबीने ताब्यात घेतले आहेत.

    मुंबई : सुशांत मृत्यू प्रकरणानंतर मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीबीने मालाडच्या एका बेकरीवर छापा टाकून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला होती. त्यावेळी तीन तस्करांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यक्तिला अटक करण्यात आली असून तो एका कॉलेजमधील विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, त्या व्यक्तिकडून एलएसडी नावाचे ड्रग्ज एनसीबीने ताब्यात घेतले आहेत.

    एनसीबीने १२ जूनला बेकरीत टाकलेल्या छाप्यात एका महिलेसह दोन जणांना अटक केली होती. मुंबई एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, केक तयार करताना त्यात अंमली पदार्थाचा वापर करण्यात येत असल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण आहे. ८३० ग्रॅम एडिब्ल वीड ब्राऊनी आणि १६० ग्रॅम गांजाचा साठा जप्त करण्यात आला. केकच्या आणि पेस्ट्रीजच्या माध्यमातून नवीन तरुण पिढी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे.

    देशात असे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे, ज्यामध्ये बेकींग केकच्या निर्मितीत अंमली पदार्थांचा वापर केला जात आहे, अशी माहिती मुंबई एनसीबीने दिली. दरम्यान, एका ३५ वर्षांच्या रिक्षा चालकाला एनसीबीच्या पथकाने जोगेश्वरीतून शनिवारी अटक केली. त्याच्याकडून ३ लाखांचा कोकेनचा साठा एनसीबीने जप्त केला. रिक्षाचालक मुंबईच्या उच्चभ्रू ठिकाणी अंमली पदार्थांचा सप्लाय करायचा. या प्रकरणातील पुढील तपास सुरु असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.

    हे सुद्धा वाचा