राज्य सरकारच्या कुलगुरू नियुक्तीच्या नव्या कायद्याविरोधात अभाविपचे मुंबई विद्यापीठात आंदोलन

कुलपतींचे अधिकार कमी करून राज्य सरकारचा विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा डाव असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. या नव्या कायद्या विरोधात आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविप कडून आंदोलन करण्यात आले आहे(Abhavip's agitation at Mumbai University against the new law of appointment of Vice Chancellor of the State Government).

    मुंबई : कुलपतींचे अधिकार कमी करून राज्य सरकारचा विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा डाव असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. या नव्या कायद्या विरोधात आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविप कडून आंदोलन करण्यात आले आहे(Abhavip’s agitation at Mumbai University against the new law of appointment of Vice Chancellor of the State Government).

    महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

    या निर्णयामुळे कुलपतींच्या कुलगुरू नेमण्याचे अधिकार कमी करून राज्य सरकारकडे घेण्यात आल्याचा आरोप अभाविपने केला आहे.शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढविण्याच्या निर्णयाला मागे घ्या अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशाराही अभाविपने दिला आहे.