कर्करोगाचे ७० टक्के रुग्ण हे निम्न आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील

भारतात प्राधान्यानं तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण अधिक आढळून येत आहे. यातही पुरूष रुग्णाचं प्रमाण अधिक आहे.

    मुंबई: जागतिक आरोग्य संघटने दिलेल्यामाहितीनुसार २०२०च्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर एकूण निदान झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतातले असल्याची माहीतीसमोर आली आहे. डब्लूएचओच्या माहितीनुसार ७० टक्के कर्करोग हा निम्न आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातले आहेत . भारतात प्राधान्यानं तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण अधिक आढळून येत आहे. यातही पुरूष रुग्णाचं प्रमाण अधिक आहे.

    टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. बडवे म्हणाले, ‘ग्लोबोकॉनच्या आकडेवारीनुसार, केवळ गेल्या दोन दशकांमध्येच नवीन रुग्णांचं निदान होण्याचं प्रमाण ६८ टक्क्यांनी वाढलं आहे. आरोग्याच्या काळजीबद्दलची साक्षरता कमी आहे, परिणामस्वरूप बहुतेक प्रकरणांमध्ये आजारपण प्रगत अवस्थेत आढळते, ज्याचा उपचार करणे कठीण असते.’

    टाटा स्मारक रुग्णालयाचे रीसर्च फेलो आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. अर्जुन सिंह म्हणाले, प्रगत टप्प्यात उपचार करण्याच्या युनिटची किंमत २,०२,८९२ रुपये असते. ती सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा (१,१,१३५ रुपये) ४२ टक्के जास्त असल्याचे दिसून आले आहे. एकूण खर्चापैकी ९७.८ टक्के खर्च वैद्यकीय उपकरणांवर होतो. प्रगत अवस्थेत शस्त्रक्रियेसाठीच्या वस्तूंच्या किमती, सुरुवातीच्या टप्प्यांपेक्षा १.४ पट जास्त असतात. शस्त्रक्रियेमध्ये अतिरिक्त केमो, रेडिओथेरपीसह, उपचारांच्या सरासरी किमतीतही ४४.६ टक्के वाढ झाली आहे.