मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई; विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५८ कोटी रुपयाचा दंड वसूल

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली आहे. आज २३ जूनपर्यंत मुंबई महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांकडून ५८ कोटींचा दंड वसूल केला आहे. यात मुंबईत पोलीस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेचाही समावेश आहे.

    मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली आहे. आज २३ जूनपर्यंत मुंबई महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांकडून ५८ कोटींचा दंड वसूल केला आहे. यात मुंबईत पोलीस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेचाही समावेश आहे.

    कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक झाले आहे. मात्र अजूनही सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरणारे आढळत आहेत. मुंबई महापालिकेकडून नागरिकांना मास्क वापरण्याबाबत सातत्याने आवाहन केले जाते. मात्र याकडे अजून अनेक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याने पालिकेने यावर लक्ष केंद्रित केले आहे.

    विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विशेष मार्शल्सची नियुक्ती केली आहे. मुंबई महापालिका, रेल्वे व पोलिसांकडून कारवाई केली जाते. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दंड वसुली करण्यात आली आहे. बुधवारी, २३ जूनपर्यंत मुंबई महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांकडून ५८ कोटींची दंड वसुली केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.