मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्या मुलाचा सक्रिय सहभाग; वडिलांनी मिळविला पैसा असा वापरला; ED चा खळबळजनक दावा

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनील देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुखचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा आज अमंलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला(Active involvement of former Home Minister Anil Deshmukh's son in money laundering case; The father used the money he earned; ED's sensational claim).

    मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनील देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुखचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा आज अमंलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला(Active involvement of former Home Minister Anil Deshmukh’s son in money laundering case; The father used the money he earned; ED’s sensational claim).

    मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित प्रकऱणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून अटक कऱण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहे. त्यातच ऋषिकेश यांनाही सन्मस बजावल्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडी जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवत असून पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरू असल्याचा दावा ऋषिकेश यांनी अर्जातून केला आहे.

    या अर्जाला ईडीने एका प्रतिज्ञापत्रामार्फत विरोध कऱण्यात आला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ऋषिकेशचा सक्रिय सहभाग आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तब्बल अकरा कंपन्या चालविल्या जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाले आहे. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये ऋषिकेश संचालक आहे किंवा भागधारक आहेत.

    या कंपन्यांचा व्यवहार संशयास्पद आहे, असा ईडीचा दावा आहे. दुसरीकडे, मनी लॉण्ड्रिंगचा पैसा विविध कंपन्यांतून दान म्हणून दाखविण्यात देशमुख यांना ऋषिकेशने मार्गदर्शन केले, असा गंभीर आरोप प्रतिज्ञापत्रात केला आहे. जर त्याला जामीन मंजूर झाला तर तो या प्रकरणातील पुरावे प्रभावित करण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असे ईडीने म्हटले आहे. त्या अर्जावर ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.