कॅन्सरच्या जनजागृतीसाठी अभिनेता बॉबी देओलचा पुढाकार, बॉबी देओलचा काय संदेश?

देशात मागील काही वर्षापासून कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. कॅन्सर हा खूप गंभीर व घातक रोग आहे. कॅन्सवर वेळीच उपचार झाले नाहीत तर, रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

    मुंबई : देशात मागील काही वर्षापासून कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. कॅन्सर हा खूप गंभीर व घातक रोग आहे. कॅन्सवर वेळीच उपचार झाले नाहीत तर, रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कॅन्सरबाबत देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तरीसुद्धा कॅन्सरमुळं मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आज मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स रुग्णालयतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेता बॉबी देओल सुद्धा कॅन्सरच्या जनजागृतीसाठी सहभागी झाला होता.

    कॅन्सरच्या जनजागृतीसाठी देशभरात अनेक संस्था, संघटना काम करत असतात. तसेच कॅन्सर हा घातक आणि जीवघेणा आजार असल्यामुळे ज्यामुळे कॅन्सर होतो, त्याचे सेवन करणे टाळा, असा संदेश अनेक सामाजिक संघटना, संस्था देत असतात. नानावटी मॅक्स रुग्णालयतर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे पेक्षा अधिक बाईकर्संनी विलेपार्ले नानावटी मॅक्स रुग्णालय ते बँड स्टँड इथपर्यंत बाईक रॅली काढली. यावेळी बाईकर्सनी कॅन्सरबाबत जनजागृती केली. त्याआधी अभिनेता बॉबी देओल यांने झेंडा दाखवून बाईकर्संना हिरवा कंदील दाखवला.

    कॅन्सरला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र या : बॉबी देओल

    या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल आल्यानंतर बाईकर्संनी तसेच चाहत्यांनी मोठ्या उत्साहात बॉबी देओलचे स्वागत केले. बॉबी देओलचे फोटो काढण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. यावेळी बोलताना बॉबी देओल म्हणाला की, कॅन्सर हा घातक आणि जीवघेणा आजार आहे. या आजारावर मात करण्यासाठी समाजात जनजागृतीची सध्या गरज आहे. या भयंकर रोगावर आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन यावेळी बॉबी देओल यांनी केले. ज्याच्यामुळे कॅन्सर होतो आणि कॅन्सर होण्यास जे कारणीभूत आहेत. असे तंबाखू, सिगारेट आणि गुटखा यांचे सेवन टाळले पाहिजे, असेही यावेळी नानावटी मॅक्स रुग्णालयाचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर अभय सोई यांनी म्हटले.