मालिकेतून काढल्याप्रकरणी अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट!

छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते.

  मुंबई – सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्यामुळे अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे.
  आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून अनेक जण सोशल मि़डियावर अभिनेते किरण माने यांचं समर्थन करताना दिसत आहे. आता या प्रकरणी अभिनेत किरण माने यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

  राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचं अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) किरण यांनी
  आरोप केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. या संदर्भात शनिवारी अभिनेते किरण माने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलण्यासाठी माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. जवळपास दीड तास शरद पवार यांनी अभिनेते किरण माने यांच्याशी चर्चा केली.

  छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.  ते त्यांच्या राजकीय भूमिका सोशल मीडियावर मांडत असतात.

  गुरुवारी (दि. 14 जानेवारी ) या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका मांडत किरण मानेंच समर्थन केलं होत. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.