salman khan

पनवेलमधल्या सलमानच्या फार्म हाऊसजवळच्या भूखंडाचे मालक असलेल्या केतन कक्कर विरूद्ध सलमाननं सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे. सलमान खानने त्याच्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मात्र त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सलमान खानसाठी हा मोठा झटका म्हणावा लागेल.

    मुंबई :  बॉलिवूडचा वादग्रस्त भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहतो. सलमानचे अजूनही लग्न झाले नसले तरी, त्याची क्रेझ चाहत्यांवर मोठी आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात. सलमान अनेक वेळा सण तसेच विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये कुटुंबासोबत जात असतो. या फार्महाऊसमधील फोटो सलमान सोशल मीडियावर शेअर करतो.  लॉकडाऊनमध्ये देखील सलमान त्याच्या या पनवेल येथील घरामध्ये राहात होता.

    दरम्यान, पनवेलमधल्या सलमानच्या फार्म हाऊसजवळच्या भूखंडाचे मालक असलेल्या केतन कक्कर विरूद्ध सलमाननं सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे. सलमान खानने त्याच्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मात्र त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सलमान खानसाठी हा मोठा झटका म्हणावा लागेल. अभिनेता सलमान खान सध्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानचा पनवेलला फार्म हाऊसही आहे. या फार्म हाऊसवर सलमान नेहमी जात असतो. सलमानच्या पनवेलमधल्या फार्म हाऊसच्या शेजारी मालाडमधले कक्कड या गृहस्थांचे देखील फार्म हाऊस आहे. त्यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप सलमानचा आहे.

    नेमके काय आहे प्रकरण?
    सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे. केतन कक्कड यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला रिप्लाय फाईल करण्यातसाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे.