अनिल अंबानींच्या अडचणीत भर; 160 कोटींचे घेतलेले कर्ज ‘फ्रॉड’

कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले 160 कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कर्जाच्या विळख्यात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. कर्नाटक बँकेने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला सूचित केल्यानेच अंबानींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  मुंबई : कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले 160 कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कर्जाच्या विळख्यात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. कर्नाटक बँकेने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला सूचित केल्यानेच अंबानींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत बँकेचा 0.39 टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये 1.98 टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी 100 टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडित खाती म्हणून नोंदवण्यात आली होती.

  अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,887 कोटी रुपये मिळतील.

  सूत्रांच्या माहितीनुसार, एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला 90 टक्के म्हणजे 2,587 कोटी रुपये जमा करेल. त्यानंतर उर्वरित 300 कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल.

  रिलायन्स पॉवर या कंपनीकडून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 1325 कोटी रुपयांचे शेअर्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये 59.5 कोटी प्रिफेन्शियल शेअर्सचा समावेश आहे. रिलायन्स पॉवरकडून रविवारी शेअर बाजार नियमकांना याबद्दलची माहिती देण्यात आली.

  हे सुद्धा वाचा