अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची मराठी भाषा विभागात बदली : सात सनदी अधिका-यांच्या बदल्या

राज्य सरकारने (The state government) पावसाळी अधिवेशनाच्या (the monsoon session) पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या आणि फेरनियुक्ती केल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या विशेष प्रकल्पावर प्रतिनियुक्तीवरून आलेले अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) प्रविण परदेशी (Pravin Pardeshi) यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे.

    मुंबई (Mumbai). राज्य सरकारने (The state government) पावसाळी अधिवेशनाच्या (the monsoon session) पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या आणि फेरनियुक्ती केल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या विशेष प्रकल्पावर प्रतिनियुक्तीवरून आलेले अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) प्रविण परदेशी (Pravin Pardeshi) यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे. तर माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजीत कुमार यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात सहसचिव पदी बदली करण्यात आली आहे.

    उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व्ही. एच. फड यांची नियुक्ती मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर गडचिरोली येथील अहेरी येथील प्रकल्प अधिकारी राहूल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भिवंडी- निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज आशिया यांची बदली जळगाव जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे.

    अटापल्ली येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी मंजू जिंदाल यांची नियुक्ती आता जालना येथे जिल्हा परिषद मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे. या शिवाय श्रीमती मिताली सेठी यांची धारणी आदिवासी प्रकल्प अधिकारी पदावरून बदली करुन चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्याधिकारी म्हणून बदली  करण्यात आली आहे.