पालकांच ठरलंय – कोरोना गेल्यावर पोरांना शाळेत पाठवणार, सर्वेक्षणातून झाला खुलासा

मुंबई महापालिकेच्या(BMC School) शाळा, पालिका शिक्षण विभागाशी संलग्न खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेत ८ लाख २४ हजार ८७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ७५ टक्के पालकांनी(parents ready to send their children in school) कोरोनाचा प्रादुर्भाव (school after corona)कमी झाल्यावर पाल्यांना शाळेत पाठविणार असल्याचे सांगितले.

  मुंबई: कोरोनामुळे(corona) अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास अद्यापही तयार हाेत नाहीत. मात्र काेराेना आटाेक्यात आल्यानंतर मुंबईतील ७५ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना लगेचच शाळेत पाठवण्याची तयारी दाखवली आहे.

  मुंबई महापालिकेच्या शाळा, पालिका शिक्षण विभागाशी संलग्न खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेत ८ लाख २४ हजार ८७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ७५ टक्के पालकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पाल्यांना शाळेत पाठविणार असल्याचे सांगितले.

  मुंबई महापालिका शिक्षण विभागाने १ ते १५ मार्चदरम्यान शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांनी मुंबईतील विविध कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील बालकांची माहिती घेतली. या सर्वेक्षणामध्ये मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये ७ लाख २७ हजार ३२५ इतके विद्यार्थी दाखल असल्याचे दिसून आले. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ही ११ हजार ५६६ इतकी आहे.

  तब्बल ५ लाख ४९ हजार ९१६ पालकांनी दर्शवला हाेकार
  बालकांप्रमाणेच पालिकेने बालकांच्या पालकांना कोरोनानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यावर नियमितपणे शाळेत पाठवण्यासंदर्भात विचारणा केली असता, तब्बल ५ लाख ४९ हजार ९१६ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठविण्याबाबत हाेकार दर्शविला. विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल ७५ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई महापालिकेच्या चेंबूर विभागातील शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी असून, याच विभागातील सर्वाधिक ८१,१८३ पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. त्याखालोखाल अंधेरी ५७,१२७, कांदिवली ५३,१९७, कुर्ला ५३,१७१, परेल ४५,०१७, भांडुप ४४,२६०, भायखळा ४०,१२८, दादर ३६,७८२, बोरिवली ३३,१३०, घाटकोपर विभागातील २९,६९४ पालकांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

  महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या
  – पहिली ते पाचवी – ५,९०,९८८
  – सहावी ते आठवी – १,०२,५५४
  – नववी, दहावी – ३३,७८३