जबाबदारी निश्चीत करून गृहमंत्र्यांचा राजीनामा घेवून चौकशी व्हायलाच हवी : राज ठाकरे यांची भूमिका

राज म्हणाले की मी छापील निवेदनापलिकडे प्रश्नाना उत्तरे देणार नाही कारण त्यामुळे मला जे आता बोलायचे आहे त्याचे गांभिर्य राहणार नाही. ते म्हणाले की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकले होते, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे पाहिले नव्हते. ठाकरे म्हणाले की, मुळातच परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवले, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का केले नाही किंवा त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? याची काही माहिती सरकारने दिली नाही. 

  मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणात केंद्राने सखोल चौकशी करायला हवी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की ही जशी चौकशी पुढे जाईल तशा फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावे बाहेर येतील,” असेही राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस ओळखले जातात. त्या पोलीसांना बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणे हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.

  विषय भरकटू देऊ नका
  ठाकरे म्हणाले की, माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला या मागे लागावे असे राज ठाकरे म्हणाले.

  “गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.’जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे,”

  -मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

  आयुक्तांच्या बदलीचे कारण काय?
  राज म्हणाले की मी छापील निवेदनापलिकडे प्रश्नाना उत्तरे देणार नाही कारण त्यामुळे मला जे आता बोलायचे आहे त्याचे गांभिर्य राहणार नाही. ते म्हणाले की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकले होते, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे पाहिले नव्हते. ठाकरे म्हणाले की, मुळातच परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवले, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का केले नाही किंवा त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? याची काही माहिती सरकारने दिली नाही.  ते म्हणाले की, मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेले जिलेटीन कुठून आले? ते म्हणाले की, सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत. ह्यात आता न जाता चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील. पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या,” असेही राज ठाकरे म्हणाले.