उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून तातडीने नाना पटोलेंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले; राजकीय घडामोडींना वेग!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून पक्षश्रेष्ठीनी तातडीने दिल्लीत पाचारण केल्याने स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती कॉंग्रेस मधील सूत्रांनी दिली आहे.

  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून पक्षश्रेष्ठीनी तातडीने दिल्लीत पाचारण केल्याने स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती कॉंग्रेस मधील सूत्रांनी दिली आहे.

  पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांचा श्रेष्ठींना अहवाल

  मागील सप्ताहात पक्ष प्रभारी एच के पाटील यांनी तीन दिवस राज्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घैतला होता त्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे. त्यावर गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे अशी माहिती या सूत्रांनी दिली. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

  विधानसभा अध्यक्षपदा नावावरून मतभेद

  या बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजा विषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमधील महामंडळ वाटपातील मतभेद, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची घोषणा, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. काँग्रेसच्या इतर प्रश्नांवर देखील बैठकीत चर्चा होऊ शकते. कोरोना, महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ याबाबत पक्षाची भूमिका यावर देखील चर्चा होऊ शकते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या अध्यक्षपाद नंतर मंत्रिपदाची देखील मागणी केली आहे. त्याना ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे खाते अपेक्षीत आहे. तर पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदासाटी कुणाचे नाव अंतिम करायचे यावर मतभेद आहेत.

  संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही

  या शिवाय सध्या पटोले यानी स्वबळाचा नारा दिला असला तरी त्यामुळे सरकार मध्ये सहभागी मंत्र्याना ते फारसे रूचले नाही त्यामुळे अश्या प्रश्नावर सातत्याने भुमिका न घेता पक्ष वाढीला प्राधान्य द्यायल हवे  से पक्ष प्रभारी यांच्याशी चर्चा करताना अनेक नेत्यानी सांगितल्याचे समजते. त्यानंतर काही दिवसांपासून पटोले दौऱ्यावर आहेत. त्यामध्येही त्यानी पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव येथे स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे.

  सेना आणि राष्ट्रवादीत देखील नाराजी

  मात्र, पक्षातील काही नेते आणि आमदार पटोले यांच्यावर नाराज असताना दुसरीकडे पटोले यांच्या घोषणेनंतर सेना आणि राष्ट्रवादीत देखील नाराजी आहे. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोनिया गांधी यांना याबाबत नाराजी कळविण्यात आल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पटोले यांना तातडीने पाचारण केले असण्याची शक्यता अय सूत्रांनी व्यक्त केली आहे दरम्यान कॉंग्रेसची स्वबळाची भाषा शेवटपर्यंत टिकेल असे वाटत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी नुकतेच तुळजापुरात केले आहे.