गृहमंत्र्यांना पाठिशी घालणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेचीही चौकशी करा,परमबीर यांच्या पत्रासंदर्भात उच्च न्यायालयात नव्याने याचिका

परमबीर सिंह(parambeer singh) यांनी गृहमंत्र्यावर(home minister anil deshmukh) केलेल्या आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar`s role in letterbomb ) यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आला आहे.

    मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambeer singh)यांच्या लेटरबॉम्ब(letter bomb)संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात शरद पवार यांच्या भूमिकेवर याचिकेमार्फत आक्षेप घेण्यात आला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडणार आहे.

    राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे.

    या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच ९० वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करण्याचा सल्ला पवारांनी दिला होता. त्यावर आक्षेप घेत असा सल्ला देण्यामागे शरद पवारांचा नेमका हेतू काय होता? असा सवाल याचिकेतून विचारण्यात आला आहे.

    तसेच या प्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. दरमहा १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पीएमएलए अंतर्गत सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर जप्तीचीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.