सरपंच-उपसरपंचांचे आंदोलनास्त्र; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ग्रामपंचायती बंद

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सरपंच, उपसरपंचांकडून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात येणार आहे. मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेने घेतला आहे. एका दिवसाच्या संपानंतरही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयावर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यांसोबत मोर्चा काढू असा इशारा सरपंच परिषदेचे दत्ता काकडे यांनी दिला आहे(Agitation of Sarpanch-Deputy Sarpanch; Gram Panchayat closed on the first day of the convention).

  मुंबई : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सरपंच, उपसरपंचांकडून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात येणार आहे. मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेने घेतला आहे. एका दिवसाच्या संपानंतरही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयावर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यांसोबत मोर्चा काढू असा इशारा सरपंच परिषदेचे दत्ता काकडे यांनी दिला आहे(Agitation of Sarpanch-Deputy Sarpanch; Gram Panchayat closed on the first day of the convention).

  राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना आर्थिक मदत वेळेत केली जात नाही. ग्रामपंचायतीं संदर्भातील मागण्यांचा पाठपुरावा करुनही मान्य होत नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र सरकार आणि सरपंच परिषदेमध्ये संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

  मागण्यांना दाखविली केराची टोपली

  सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीं संदर्भातील मागण्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील मान्य होत नाही. राज्य सरकारने आयसीआयसीआय बँकेत ग्रामपंचायतीचे खाते काढण्यास सांगितले. मात्र ग्रामीण भागात ही बँकच नाही. गावात वीज पूर्णपणे बंद असतानाही वीज बीले भरली. गावातील पाणी पुरवठ्यांच्या अनेक योजना बंद आहेत. मात्र त्याची बिले पाठवली जात आहेत. राज्यभरातील 30-35 सरपंचानी आपला जीव गमवला. मात्र त्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही.

  ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींवर नेहमी अन्याय होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्राम विकासमंत्र्यांनी याची दखल घेऊन सरपंचांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा संपूर्ण ग्राम पंचायती बंद राहतील.

  ॲड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस, सरपंच परिषद