पहिल्या दिवसापासून विरोधकांना आमचे सरकार पडावे अशी इच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. परंतु ते आऊट ऑफ स्टेशन असल्यामुळे त्यांना भेटता आलेलं नाहीये. तसेच पहिल्या दिवसापासून विरोधकांना आमचे सरकार पडावे अशी इच्छा होती. पण आम्ही पूर्णपणे बहुमत: असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. पण मला त्यांना सांगायचंय की, महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहेत. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे, असं अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. परंतु ते आऊट ऑफ स्टेशन असल्यामुळे त्यांना भेटता आलेलं नाहीये. तसेच पहिल्या दिवसापासून विरोधकांना आमचे सरकार पडावे अशी इच्छा होती. पण आम्ही पूर्णपणे बहुमत: असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, आरोप केले तरी राज्य सरकार नियमानुसार काम करत आहे. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं सांगत राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असं अजित पवार म्हणाले.