राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतो हे आता स्पष्ट झाले आहे : राष्ट्रवादी प्रवक्ते मलिक यांचा आरोप

भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यानी  राज्यपालांची भेट घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित कथित घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यानी भाजप व राज्यपालांवर टीका केली. ते म्हणाले की, 'राज्यपाल भवन हा आता राजकीय अड्डा झाला आहे.

    मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेत असतील तर त्यात काही वावगे नाही. कारण आता  राजभवन देखील राजकारणाचा आखाडा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नबाब मलिक यानी केला आहे. आपण राज्यपाल या प्रतिष्ठित पदावर आहोत याची जाणीव महाराष्ट्राच्या राज्यपालांना नाही. त्यामुळं ते रोजच्या रोज भाजपच्या लोकांना भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे,’ असा आरोपही मलिक यानी केला आहे.

    राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने

    भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यानी  राज्यपालांची भेट घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित कथित घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यानी भाजप व राज्यपालांवर टीका केली. ते म्हणाले की, ‘राज्यपाल भवन हा आता राजकीय अड्डा झाला आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत. भाजपचे कार्यकर्ते राज्यपालांना भेटताहेत. यात बातमी होण्यासारखे काहीच नाही,  ते म्हणाले की, आपण राज्यपाल या प्रतिष्ठित पदावर आहोत याची जाणीव महाराष्ट्राच्या राज्यपालांना नाही. त्यामुळं ते रोजच्या रोज भाजपच्या लोकांना भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे,’ असा आरोपही मलिक यानी केला आहे.