
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या तीन कथित घोटाळ्यांविरोधात भाजपनेते किरीट सोमैय्या(Kirit Somaiya) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून तक्रार दाखल केली आहे. प्रदेश भाजप कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना सोमैय्या यानी याभात माहिती दिली.
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या तीन कथित घोटाळ्यांविरोधात भाजपनेते किरीट सोमैय्या(Kirit Somaiya) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून तक्रार दाखल केली आहे. प्रदेश भाजप कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना सोमैय्या यानी याभात माहिती दिली.
राज्यपालांनी याबाबत उचित चौकशीचे आदेश देण्यात येतील असे सांगितले आहे. सोमैय्या यानी शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्या विरोधात केलेल्या आरोपां प्रकरणी गवळी यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत उद्या दिल्लीत जावून संबंधित अधिका-यांकडे तक्रार करत असल्याचे म्हटले आहे. तर १९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे जाण्यापासून रोखताना मुंबई पोलीसांनी केलेल्या बेकायदा कारवाईबाबतही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय मानव आयोगाने चौकशी करावी अशी मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमैय्या यानी प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी गृह विभागाच्या माध्यमातून मुंबईतील पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्फत माफिया प्रमाणे माझ्यावर बेकायदा कारवाइ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विरोधात मी चौकशीची मागणी केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायतीकडून वार्षिक पाच लाख रूपये गोळा करण्याबाबत आदेश दहा मार्च रोजी देण्यात आले असून त्या बाबत पुरावे मी केंद्र सरकारला देणार असून चौकशीचे आदेश देण्यास भाग पाडणार आहे. या शिवाय ईडी आणि सीबी आय मार्फत त्यांच्या अन्य कारखान्यातील हवाला प्रकरणी देखील तक्रार दाखल केल्याचे ते म्हणाले.