कोट्यावधींची लाच आणि वसुलीचे आरोप; आज तरी अनिल देशमुख ED समोर हजर राहणार का?

ईडीने देशमुख यांना शनिवारी चौकशीसाठी समन्स बजावले होते परंतु त्यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी नवी तारीख मागितली होती. त्याच दिवशी ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास बजावले होते. देशमुख यांच्यावर पब, बार आणि रेस्टोरेंट्सकडून कोट्य‌धींची लाच घेण तसेच निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेमार्फत वसुली करण्याचा आरोप आहे.

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मंगळवार 29 जून रोजी सक्तवसुली व अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर व्हावयाचे आहे. ईडीने शनिवारी त्यांच्याविरोधात दुसऱ्यांदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नागपुरातील वकील तरुण परमार यांचा जबाब नोंदविला. परमार यांनीही मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्यावर आरोप केले होते.

    वकील तरुण परमार यांनी गेल्याच आठवड्यात देशमुख आणि अन्य नेत्यांविरोधात ईडीकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर ईडीने परमार यांना समन्स बजावले होते. वसुलीसंदर्भात हे नेते मनी लाँड्रिंग प्रकरणात कसे सहभागी होते याची माहिती असल्याचा दावा परमार यांनी केला. पुराव्या दाखल काही दस्तावेज असल्याचा दावाही त्यांनी केला होता. परमार सोमवारी सकाळी 11 वा. दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले तेव्हा त्यांच्या हाती काही दस्तावेजही होते.

    यापूर्वी ईडीने देशमुख यांना शनिवारी चौकशीसाठी समन्स बजावले होते परंतु त्यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी नवी तारीख मागितली होती. त्याच दिवशी ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास बजावले होते. देशमुख यांच्यावर पब, बार आणि रेस्टोरेंट्सकडून कोट्य‌धींची लाच घेण तसेच निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेमार्फत वसुली करण्याचा आरोप आहे.

    यासंदर्भात तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी आरोप केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. ईडीने शनिवारी देशमुख यांचे सहायक सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली होती. हे दोघेही सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.