शाळा, धार्मिक स्थळ, चित्रपटगृहे सगळचं सुरु होणार मग लोकल ट्रेनचं काय? सर सकट सर्व मुंबईकरांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळण्याबात महत्वाची बातमी

कोविड-१९च्या दुस-या लाटेचा जोर आता ब-यापैकी कमी होताना दिसत असून गणेशोत्सवानंतर काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढल्याची शक्यता असतानाच ठाकरे सरकारने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ४ ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळांना ७ ऑक्टोबर आणि चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहांना २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लक्षावधी मुंबई कराना रोजीरोटीसाठी प्रवास कराव्या लागणा-या उपनगरी रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश आणि प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.

    मुंबई : कोविड-१९च्या दुस-या लाटेचा जोर आता ब-यापैकी कमी होताना दिसत असून गणेशोत्सवानंतर काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढल्याची शक्यता असतानाच ठाकरे सरकारने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ४ ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळांना ७ ऑक्टोबर आणि चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहांना २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लक्षावधी मुंबई कराना रोजीरोटीसाठी प्रवास कराव्या लागणा-या उपनगरी रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश आणि प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.

    तिकीट मिळत नसल्याने मासिक भुर्दंड

    १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्याना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, १८ ते ४४ या वयोगटातील बहुतांश नोकरदार आहेत. ४५ ते ६० वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे, तर ६० हून अधिक वयाचे प्रवासी प्रवास करणेच टाळत आहेत. त्याशिवाय तिकीट मिळत नसल्यानेही अनेकांना फक्त पास दिला जात असल्याने प्रवासाचा त्रैमासिक भुर्दंड सहन करावा लागत आहे असे कोटीयन यांनी म्हटले आहे.

    रोजीरोटीसाठी दररोज पाच ते सहा तास बसने प्रवास

    लोकलमधून महिन्यातून दोनदाच जावे लागणा-याना महिन्याचा पास का काढायचा हा प्रश्न आहे. बहुतांश कामगार १८ ते ४४ वयोगटाचे असल्याने त्यांपैकी काही जणांचे दोन डोस अद्यापही पूर्ण झाले नाहीत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांना रोजीरोटीसाठी दर रोज पाच ते सहा तास बसने प्रवास करावा लागत आहे. त्यांना तातडीने लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी कोटीयन यानी केली आहे.