Cyclone 'Rose' threatens Maharashtra

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाची(gulab chakri vadal) निर्मिती झाली. हे वादळ आंधप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला धडकताच मुसळधार पाऊस सुरू झाला. याच वादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मराठवाड्यात दिसून येत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे(Heavy to very heavy rains expected in Mumbai, Thane, Marathwada, Central Maharashtra, Konkan in next 24 hours).

    मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाची(gulab chakri vadal) निर्मिती झाली. हे वादळ आंधप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला धडकताच मुसळधार पाऊस सुरू झाला. याच वादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मराठवाड्यात दिसून येत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे(Heavy to very heavy rains expected in Mumbai, Thane, Marathwada, Central Maharashtra, Konkan in next 24 hours).

    त्याचबरोबर विविध जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.

    दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई, ठाण्यासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भात प्रभाव कमी तर उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये प्रभाव राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सोमवारी चक्रीवादळ निवळले असून त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.

    हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिशाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर 30 सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.