…अखेर अ‍ॅमेझॉन मनसेसमोर झुकली, सात दिवसांच्या आत मराठी भाषेचा अंतर्भाव करणार

अ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ५ जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसैनिक प्रचंड संतापले होते. परंतु मनसेने अ‌ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजल्यानंतर अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे.

मुंबई : अ‌ॅमेझॉनने (Amazon) मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यास होकार दिला असून सात दिवसांच्या आत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर (website) मराठी भाषा उपलब्ध होणार आहे. मनसेच्या खळखट्यानंतर अ‌ॅमेझॉनने माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे. मनसेने मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयामध्ये खळखट्याक केल्यानंतर त्यांनी माघार घेणे हेच गरजेचे समजले.

अ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ५ जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसैनिक प्रचंड संतापले होते. परंतु मनसेने अ‌ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजल्यानंतर अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता अ‌ॅमेझॉनचे अधिकारी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावं लागणार आहे.

काय आहे नेमका वाद?

अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेतली होती.