पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा? अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांना सवाल ; सचिन सावंत यांनीही सांगितलं पेनड्राईव्हच्या माहितीतलं सत्य…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला. त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्रजींनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावे, असा सवाल उपस्थित करत मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.

    मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. आपल्याकडे याबाबतच्या संवादाचा ६.३ जीबीचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा देखील फडणवीस यांना नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. मात्र वस्तुस्थिती तशी नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

    यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला. त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्रजींनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावे, असा सवाल उपस्थित करत मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.

    सचिन सावंतांनी सांगितलं पेनड्राईव्हच्या माहितीतलं सत्य…

    रश्मी शुक्ला यांनी कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता. मुख्य सचिवांच्या अहवालात सत्य समोर आले. फडणवीस साहेब असत्य बोलले. देशभरात महाराष्ट्राची बदनामी केली. केंद्रीय गृह सचिवांना असत्य माहिती दिली. जाहीर निषेध, असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.