आनंदराव अडसुळ यांची अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव; पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा ससेमीरा पाठी लागल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे(Anandrao Adsul again in High Court; Petition for pre-arrest bail). सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाच्या अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत याचिकेची प्रत ईडीला देण्याचे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी २९ नोव्हेबरपर्यंत तहकूब केली आहे.

    मुंबई : मुंबई सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा ससेमीरा पाठी लागल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे(Anandrao Adsul again in High Court; Petition for pre-arrest bail). सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाच्या अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत याचिकेची प्रत ईडीला देण्याचे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी २९ नोव्हेबरपर्यंत तहकूब केली आहे.

    शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ मुंबई सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बॅंकेत सुमारे ९०० कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणांनी केली. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर २७ सप्टेंबरला सकाळी अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकून ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान ईडीचा कारवाई विरोधात अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

    उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अडसूळ यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जाची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सतभाई यांनी दखल घेतली. मात्र अटकपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार देत अर्जाची सुनावणी 25 नोव्हेंबरला निश्‍चित केली. या निर्णया विरोधात अडसुळ यांच्यावतीने अ‍ॅड. सुबोध देसाई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अटकपूर्व जामीन देण्याची विनंती केली आहे. त्या याचिकेवर न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली.

    उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. तर उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. तसेच विशेष पीएमएलए न्यायालयालयाने अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २५ नोव्हेबरपर्यंत तहकूब ठेवताना अंतरिम दिलासा देण्याची विनंती फेटाळली आहे. त्याविरोधात याचिका दाखल केल्याचे यावेळी अ‍ॅड संबोध देसाई यांनी स्पष्ट केले. त्याची दखल न्यायालयाने २९ नोव्हेबरला निश्‍चित केली.