ईडीच्या कारवाईदरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली; हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आनंदरावर अडसूळ यांनी बीपी व शुगरचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं आज त्यांची तब्येत अचानक बिघडली. आनंदराव अडसूळ यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज चौकशीसाठी ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी दाखल झाले होते. अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

    मात्र, अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आनंदरावर अडसूळ यांनी बीपी व शुगरचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं आज त्यांची तब्येत अचानक बिघडली. आनंदराव अडसूळ यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    दरम्यान, ईडीचे अधिकारी सकाळीच अडसूळ यांच्या घरी पोहचल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स बजावल्याची माहिती आहे.

    अडसूळांवर नेमके आरोप काय?

    सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. त्यातील जवळपास ९ हजार खातेधारक होतो. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळं बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.