Like Anil Deshmukh, Anil Parab is likely to face CBI; Sutovaca of BJP leaders

पोलीस अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर झालेला आहे. या प्रकरणात ईडीने आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे(Anil Deshmukh and Anil Parab accused of taking money from police officers for transfer; Summons of Chief Secretary ED). मात्र, चौकशीला हजर राहण्याबद्दल कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे.

    मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर झालेला आहे. या प्रकरणात ईडीने आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे(Anil Deshmukh and Anil Parab accused of taking money from police officers for transfer; Summons of Chief Secretary ED). मात्र, चौकशीला हजर राहण्याबद्दल कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे.

    मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देशमुख आणि अनिल परब यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वसुली प्रकरणाची चौकशी करत असतानाच ईडीने या प्रकरणासंदर्भात सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली.

    सीताराम कुंटे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कुंटे यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल सीताराम कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची बैठक असून, बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचं कुंटे यांनी म्हटले आहे.