सचिन वाझेने अंगुलीनिर्देश केलेला ‘तो’ नंबर वन म्हणजे अनिल देशमुखच; इडीचे देशमुखांविरोधात तब्बल सात हजार पानांचे आरोपपत्र

100 कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे हे दुसरे आरोपपत्र आहे. 7,000 पानांच्या या आरोपपत्रात देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील देशमुख यांचीही नावे आहेत. यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे(Anil Deshmukh is the number one 'he' pointed out by Sachin Waze; Ed's indictment of 7,000 pages against Deshmukh).

  मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे हे दुसरे आरोपपत्र आहे. 7,000 पानांच्या या आरोपपत्रात देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील देशमुख यांचीही नावे आहेत. यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे(Anil Deshmukh is the number one ‘he’ pointed out by Sachin Waze; Ed’s indictment of 7,000 pages against Deshmukh).

  देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना ईडीच्या पथकाने 2 नोव्हेंबरला अटक केली होती, तर त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना जूनमध्ये अटक करण्यात आली होती. आरोपपत्रात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.

  ‘तो’ नंबर वन म्हणजे…

  विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने अंगुलीनिर्देश केलेला ‘तो’ नंबर वन म्हणजे अनिल देशमुखच असावेत असा संशय ईडीला आहे. वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये चार कोटी 70 लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी 2021 या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता.

  शेल कंपन्यांचाही उल्लेख

  या दोघांविरुद्ध 24 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता.  देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांच्याकडे दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी रुपये वसुल केली. 4.18 कोटी रुपये दिल्लीतील 4 वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते. या कंपन्यांनी ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टला दिली.  देशमुख यांनी पत्नी आरती देशमुख यांच्या नावे मुंबईतील वरळी येथे फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट 2004 मध्ये रोख पैसे देऊन खरेदी करण्यात आला होता. प्रीमियर पोर्ट लिंक्स या कंपनीत देशमुख कुटुंबाची 50 टक्के हिस्सेदारी आहे. ही हिस्सेदारी 17.95 लाख रुपयांना विकत घेण्यात आली, तर कंपनी आणि तिची – उर्वरित मालमत्ता 5.34 कोटी रुपये आहे.

  देशमुख यांच्या विरोधात लवकरच तिसरी चार्जशीही दाखल होईल याशिवाय या प्रकरणातील अधिक लाभार्थींची नावे देखील त्यात समोर येतील.

  - किरीट सोमय्या, भाजपा नेते