शरद पवारांनी केलेल्या पाठराखणीनंतर अनिल देशमुखांचीही सारवासारव, ५ ते १५ फेब्रुवारीच्या काळात हॉस्पिटलमध्ये आणि नंतर क्वारंटाईन असल्याचे स्पष्टीकरण

अनिल देशमुख(anil deshmukh) यांनी म्हटले आहे की, मी ५ ते १५ फेब्रुवारीच्या काळात नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होत. १५ फेब्रुवारीला जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर काही पत्रकार माझी वाट बघत होते.

    राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार(sharad pawar press conference) यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. गृहमंत्री फेब्रुवारीध्ये कोरोनामुळे आधी रुग्णालयात आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कोणत्या आधारावर म्हणतात? असा प्रश्न विचारत वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे.

    अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, मी ५ ते १५ फेब्रुवारीच्या काळात नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होत. १५ फेब्रुवारीला जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर काही पत्रकार माझी वाट बघत होते. त्यांना खूप प्रश्न विचारायचे होते. मात्र माझ्या अंगात त्राण नव्हते कारण मी कोरोनातून नुकताच बाहेर आलो होते. मी खुर्चीवर बसून काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर मी गाडीतून निघून गेलो. १५ फेब्रुवारीनंतर मी होम क्वारंटाईन होतो.त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.