अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार, भाजपच्या ”या” नेत्याचं मोठ विधान

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार आहे असं म्हटलंय. अनिल देशमुखांनी घोटाळ्याचा पैसा हा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांद्वारे आपल्या परिवाराच्या नावावर असलेल्या लोकांकडे वळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ ३ वर्ष जेलमध्ये होते, आता अनिल देशमुख आणि अनिल परबांची अवस्थाही अशीच होणार असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या होत्या.

    दरम्यान आता अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यानं प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्यानं, अनिल देशमुख यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    किरीट सोमय्या काय म्हणाले ?

    याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार आहे असं म्हटलंय. अनिल देशमुखांनी घोटाळ्याचा पैसा हा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांद्वारे आपल्या परिवाराच्या नावावर असलेल्या लोकांकडे वळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ ३ वर्ष जेलमध्ये होते, आता अनिल देशमुख आणि अनिल परबांची अवस्थाही अशीच होणार असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

    मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ECIR दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने शुक्रवारी पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे त्यांच्या नागपूरातील घरी नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. पण, त्यांचे कुटुंबीय घरी आहे, असं कळतंय. सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी त्यांना सीबीआयने अटक केली नव्हती.