देशमुखांच्या सागण्यावरुनच वाझेंनी बार मालकांकडुन वसुली केली आणि… ED चा कोर्टात खळबळजनक दावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले. मनी लाँडरिंगमध्ये देशमुख सहभागी असून त्यांचे स्वीय कुंदन शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी पैसे घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच देशमुख सुद्धा पोलीस बदली आणि बार मालकांकडून पैसे घेण्याच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. यासंदर्भात बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यानुसार, सचिन वाझे यांना डिसेंबर २०२० मध्ये गुड लक मनी म्हणून ४० लाख रुपये देण्यात आले होते. झोन १ ते ६ यांच्याकडून १.६४ कोटी रूपये देण्यात आले. झोन ७ ते १२ च्या बारमालकांकडून २.७४ कोटी रूपये गोळा करण्यात आले. बार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी हे पैसे सचिन वाझेंना दिले. याप्रकरणी सचिन वाझेंचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार, पैसे गोळा करून ४.७० कोटी कुंदन शिंदे यांना दिले, शिवाय संजीव पालांडे यांनी पैसे घेतल्याचे जबाबात म्हटले आहे.

  मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकऱणी (अंमलवजावणी संचलनालय) ईडीनेमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालय आणि घरांवर झाडी टाकल्या. त्यात त्यांचे स्विय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली. त्यांना शनिवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मनी लाँडरिंगमध्ये देशमुख सहभागी असल्याचा दावा ईडीच्या करण्यात आला.

  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपाच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी माजी गृमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरावर झाडी टाकत त्यांचे स्विय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिवांना सचिन पलांडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली. तसेच अनिल देशमुख यांना समन्स बजावले.

  दरम्यान, दोघांनाही शनिवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा हे एक राजकीय षडयंत्र असून त्यांना यात गुंतविण्यात आले असल्याचा दावा शिंदे आणि पलांडे यांच्यावतीने करण्यात आला. आमची चौकशी करायची होती तर समन्स बजावता आले असते. मात्र ईडीने सर्वप्रथम छापा टाकला आम्हाला तिथे बोलावून आपल्यासोबत घेऊन जाऊन रात्री उशीरा अटक केली

  ईडी ही एक उच्च आणि पदसिद्ध यंत्रणा आहे. मात्र सध्या ती स्थानिक पोलीसांसारखे काम करत असल्याचा दावा आरोपींकडून करण्यात आला. तसेच पोलीसांच्या बदल्या या पोलिस आस्थापन मंडळाकडून केल्या जातात. त्यांच्या सुचनेनुसार मुख्यमंत्री निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हे निराधान असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला.

  दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले. मनी लाँडरिंगमध्ये देशमुख सहभागी असून त्यांचे स्वीय कुंदन शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी पैसे घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच देशमुख सुद्धा पोलीस बदली आणि बार मालकांकडून पैसे घेण्याच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. यासंदर्भात बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यानुसार, सचिन वाझे यांना डिसेंबर २०२० मध्ये गुड लक मनी म्हणून ४० लाख रुपये देण्यात आले होते. झोन १ ते ६ यांच्याकडून १.६४ कोटी रूपये देण्यात आले. झोन ७ ते १२ च्या बारमालकांकडून २.७४ कोटी रूपये गोळा करण्यात आले. बार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी हे पैसे सचिन वाझेंना दिले. याप्रकरणी सचिन वाझेंचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार, पैसे गोळा करून ४.७० कोटी कुंदन शिंदे यांना दिले, शिवाय संजीव पालांडे यांनी पैसे घेतल्याचे जबाबात म्हटले आहे.

  सदर प्रकरणी चौकशी सुरू असून आरोपी चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांना मिळत असलेले पैशांची माहिती घ्यायची आहे. आरोपींना रक्कम किती मिळाली याची चौकशी करायची आहे. तसेच ४.७० कोटी रुपये कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करून ते पुन्हा परत आले, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्हाला त्यांची कोठडीची गरज असल्याचा दावा ईडीच्या वतीने कऱण्यात आला. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने कुंदन शिंदे आणि सचिन पलांडे यांना 1 जुलैपर्यंत कोठडी सुनावली.