अनिल देशमुखां विरोधात तक्रार करणाऱ्या वकिलांचीच होणार चौकशी; पुरावे घेऊन हजर होण्याचे ईडीचे आदेश

सूत्रांच्या माहितीनुसार वकिल तरुण परमार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नागपुरातील अन्य एक मंत्री, त्यांचे सचिव आणि अन्य मोठ्या अधिकाऱ्यांचा हवाला प्रकरणात सहभाग असल्याची तक्रार केली होती. याबाबत परमार त्यांच्याकडे पुराव्यादाखल असलेले कागदपत्र घेऊन ईडीने कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार करणारे नागपूरातील वकिल तरुण परमार यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला असल्याचे समजते. परमार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

    परमार यांच्याकडे पुराव्यादाखल कागदपत्र

    सूत्रांच्या माहितीनुसार वकिल तरुण परमार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नागपुरातील अन्य एक मंत्री, त्यांचे सचिव आणि अन्य मोठ्या अधिकाऱ्यांचा हवाला प्रकरणात सहभाग असल्याची तक्रार केली होती. याबाबत परमार त्यांच्याकडे पुराव्यादाखल असलेले कागदपत्र घेऊन ईडीने कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    तक्रार करणाऱ्या वकिलांची चौकशी

    दरम्यान, शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्यात आल्यानंतर ईडीने देखील त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे यांना दोघांनाही अटक करण्यात आली. आता देशमुखांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या वकिलांची चौकशी केली जाणार असल्याने त्यामधून ईडीला काही माहिती मिळाल्यास देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.