anil parab

हवाला प्रकरणी अनिल परब(Anil Parab) परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. पण पहिले समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांना दुसरे समन्स बजावण्यात आले. त्यात त्यांना आज मंगळ‍वारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आज अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात)(Anil Parab In Ed Office) हजर झाले.

    मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab In ED Office) यांना सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने दुसऱ्यांदा समन्स(Ed Summons To Anil Parab) बजावले आहे. त्यानुसार ईडीसमोर हजर रहात असल्याचे अनिल परब यांनी माध्यमांसमोर सांगितले. ते म्हणाले की, मी ईडी कार्यालयात आज जात आहे. माझे चौकशीत पूर्ण सहकार्य असेल. मी पूर्वीच बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) आणि माझ्या मुलीची शपथ घेवून सांगितले आहे की चुकीचे काही केलेले नाही. तेच माझे आजही म्हणणे आहे असे परब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

    हवाला प्रकरणी परब यांना दुसऱ्यांदा समन्स
    दरम्यान हवाला प्रकरणी परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. पण पहिले समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांना दुसरे समन्स बजावण्यात आले. त्यात त्यांना आज मंगळ‍वारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आज अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. ते म्हणाले की,  ईडी चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहे. याआधीही चौकशी झाली आहे. मात्र, आता मला का बोलावण्यात आले आहे, याची माहिती नाही, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

    २० कोटी रूपये मिळाल्याचा जबाब
    दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या हवाला प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवल्याचे समजते. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना २० कोटी रूपये मिळाल्याचा जबाब निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने दिला होता. त्याकरिता ईडी परब यांची चौकशी करणार आहे.