रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणतायत ‘नो कमेंट’

रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परब यांनी बोलणे टाळत प्रतिक्रिया दिली आहे की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असे परब यांनी म्हटले आहे. रामदास कदम यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखला गेला, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख आहेत की, अनिल परब असा सवाल त्यांनी केला.

    मुंबई :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यानी कठोर शब्दात टीका केल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी याबाबत कोणतिही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कदम शिवसेना नेता आहेत ते जे काही बोलत असतील त्याची पक्ष आणि पक्ष प्रमुख दखल घेतील, त्यावर आपण काही बोलणार नाही असे परब यानी माध्यमांना सांगितले. मंत्रीपद मिळाल्यानंतर परब यांनी पक्षासोबत गद्दारी करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोकणातील शिवसेनेच्या जागा देण्यात पुढाकार घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे.

    जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल

    रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परब यांनी बोलणे टाळत प्रतिक्रिया दिली आहे की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असे परब यांनी म्हटले आहे.

    काय म्हटलं होतं रामदास कदम यांनी?

    रामदास कदम यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखला गेला, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख आहेत की, अनिल परब असा सवाल त्यांनी केला.

    रामदास कदम म्हणाले की, ‘माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट सुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आणि ते किती चुकीचे आहे हे स्पष्ट दिसत असल्यानंतर माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही.’